Exclusive : उद्धव ठाकरेंकडूनच राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन; रामदास कदमांचा खळबळजनक दावा, स्फोटक मुलाखत

राज ठाकरेंना जीवे मारण्याचा डाव कुणाचा होता? असा सवाल उपस्थित करत कदमांनी एकप्रकारे गौप्यस्फोटच केला आहे.
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना-मनसे (Shivsena) म्हणजेच ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा जोरदार सुरू असून 5 जुलै रोजी विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येत आहेत. शाळेतील इयत्ता पहिलीपासून हिंदी किंवा इतर भाषा सक्तीचा शासन आदेश मागे घेण्यात आल्यानंतर ठाकरे बंधूंकडून (Uddhav Thackeray) आवाहन करण्यात आलेला मोर्चा रद्द करण्यात आला. मात्र, 5 तारखेला मराठीच्या मुद्द्यावरुन विजयाचा जल्लोष केला जाणार आहे. त्यामुळे, ठाकरे बंधूंच्या एकीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे महायुतीमधील काही नेते किंवा बाळासाहेब ठाकरेंसमवेत शिवसेनेत काम केलेले वरिष्ठ नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. खासदार नारायण राणे यांच्यानंतर आता राज-द्धव युतीवर माजी मंत्री व ज्येष्ठ नेते रामदास कदमांनी (Ramdas kadam) स्फोटक मुलाखत दिली. राज ठाकरेंना (Raj Thackeray) जीवे मारण्याचा कोणाचा डाव होता? असा थेट सवाल कदम यांनी विचारला आहे.
राज उद्धव ठाकरेंच्या संघर्षाची रामदास कदमांनी चिरफाड करण्याचा प्रयत्न आपल्या मुलाखतीमधून केला आहे. राज ठाकरेंना जीवे मारण्याचा डाव कुणाचा होता? असा सवाल उपस्थित करत कदमांनी एकप्रकारे गौप्यस्फोटच केला आहे. कणकवलीत राज ठाकरेंसोबत काय घडणार होतं ? राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यानं हितं कसं होणार? राज-उद्धवच्या युतीत कुणाचा बळी जाईल? रामदास कदमांनी राज ठाकरेंच्या डोळ्यात कधी पाणी पाहिलं ? विजय सभा काढायला नेमका कोणाचा विजय झाला? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे कदम यांनी आपल्या मुलाखतीतून दिली आहेत.