वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसल्याचा मनिषा कायदेंचा दावा, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर

सरकारनं त्रिभाषा धोरणाबाबतचा निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे 5 जुलै रोजी विजयी मेळावा साजरा करणार आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
Sharad Pawar : वारीमध्ये अर्बन नक्षलवाद घुसल्याचा दावा शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी केला होता. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वारीतील घुसखोरीबाबत काल दोन संस्थांची नावे बाहेर आली आहेत. त्यातील लोकायत एक संस्था आहे. ती संस्था अनेक चांगली कामे करत आहे, ती नक्षली नाही. मागे काही लोकांना अनेक वर्षे तुरुंगात टाकलं होतं. नक्षली शिक्के मारण्याचं काम केलं जातं असल्याचे शरद पवार म्हणाले. श्यामसुंदर सोन्नर हे अनेक वर्षापासून चांगलं काम करत आहेत. चांगली काम करणाऱ्यांवर शिक्के मारले जात आहेत असे पवार म्हणाले.
सरकारनं त्रिभाषा धोरणाबाबतचा निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे 5 जुलै रोजी विजयी मेळावा साजरा करणार आहे. मुंबईतील वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा एकत्रित भव्य मेळावा होणार आहे. या मेळाव्यावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष उपस्थित राहणार का? याबाबत खुद्द शरद पवारांनाच विचारण्यात आले. यावेळी शरद पवार म्हणाले की, काल पार्टीचे अध्यक्ष जयंत पाटील मला भेटले होते. त्यांनी सांगितलं आहे की, जे आंदोलन सुरू आहे त्याला पक्षाने पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये सहभागी देखील होणार आहेत. त्यामुळं पक्षांच्या अध्यक्षांचा आदेश मी मानतो असे शरद पवार म्हणाले. मी त्या कार्यक्रमाला जाणार नाही, कराण माझे दुसरीकडे कार्यक्रम असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.
पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराच्या मुद्यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. काही लोक मला भेटले होते. महत्मा फुले, छत्रपती संभाजीराजे यांची नावं त्यांनी सुचवल्याचे शरद पवार म्हणाले. शक्तीपीठ महामार्गाबाबत देखील शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. बेळगावला जायला चांगला रस्ता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चांगले रस्ते तयार केले आहेत. मध्ये मध्ये कामामुळे काही ठिकाणी डायव्हर्जन आहे. परंतू, सध्याचा रस्ता उत्तम आहे, असं असताना दुसरा रस्ता कशाला हवा? असा सवाल शरद पवारांनी केला. मुख्यमंत्री म्हणतायेत या रस्त्याची गरज आहे. एक रस्ता असताना दुसरा कशाला? आम्ही त्यांच्याकडून समजून घेऊ असे शरद पवार म्हणाले. केवळ रस्ता होत नसतो तर त्यात अनेकांच्या जमीन जात असतात. आम्ही मुख्यमंत्र्यांकडून समजून घेऊ की दुसरा रस्ता का गरजेचा आहे असे शरद पवार म्हणाले.