महाराष्ट्र

Sandeep Deshpande On Devendra Fadnavis: राज अन् उद्धव ठाकरेंच्या मुलांची शाळा काढणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना संदीप देशपांडेंनी अंगावर घेतले; म्हणाले, तुम्ही मुख्यमंत्री.

Sandeep Deshpande On Devendra Fadnavis: मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचं आणि भारतीय भाषांना विरोध करायचा, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली.

Sandeep Deshpande On Devendra Fadnavis: मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचं आणि भारतीय भाषांना विरोध करायचा, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेवर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बॉम्बे स्कॉटिश महाराष्ट्रातीलच शाळा आहे. राज्य सरकारने परवानगी दिलेलीच ती शाळा आहे ना?, असं सवाल संदीप देशपांडेंनी विचारला. बॉम्बे स्कॉटिश शाळा वाईट आहे, असं देवेंद्र फडणवीसांना म्हणायचं आहे का?, असंही संदीप देशपांडे म्हणाले. बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकण्यात गैर काय?, असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.  तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काय करताय? तसेच भाजपचे नेते कोणत्या शाळेत शिकले हे मी सांगू का, असंही संदीप देशपांडेंनी सांगितले. महाराष्ट्रमधला मराठी माणूस एकत्र आलाय त्यामुळे शासन हदरलंय, असंही संदीप देशपांडेंनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. ठाकरे बंधूंचा भारतीय भाषांना विरोध, मात्र इंग्रजीला पायघड्या, असा हल्लाबोल देखील देवेंद्र फडणवीसांनी केला. दरम्यान, पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे जीआर मागे घेतल्यानंतर, ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. तसंच सरकारच्या समितीला न जुमानण्याची भाषा दोन्ही ठाकरेंनी केली. मात्र कुणाच्याही दबावाला बळी न प

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button