महाराष्ट्र

Pune Crime news: मोठी बातमी: पुणे रेल्वे स्थानकाबाहेरील महात्मा गांधींच्या पुतळ्यावर माथेफिरुकडून कोयत्याने वार

Pune Mahatma Gandhi Statue: पुण्यातील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरज शुक्ला नावाच्या व्यक्तीने पुतळ्याची तोडफोड केली.

Pune News: पुणे रेल्वे स्थानकाबाहेर असणाऱ्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावर एका माथेफिरुने कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी रेल्वे स्थानकाच्या (Pune Railway station) परिसरात अनेक प्रवासी होते. त्यावेळी सुरज शुक्ला नावाचा तरुण हातात कोयता घेऊन याठिकाणी आला. त्याने केशरी  रंगाचा कुर्ता धातला होता. सुरज शुक्ला हा महात्मा गांधींचा (Mahatama Gandhi) पुतळा असलेल्या चौथऱ्यावर चढला आणि त्याने पुतळ्यावर कोयत्याने वार करायला सुरुवात केली. हा प्रकार प्रवाशांनी पाहिल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांना पाचारण केले. रेल्वे पोलिसांनी तातडीने सुरज शुक्ला (Suraj Shukla) याला चौथऱ्यावरुन खाली उतरवून ताब्यात घेतले. सुरज शुक्ला याने तोपर्यंत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या छातीवर आणि पायाने कोयत्याने वार केले होते. त्याला गांधींच्या पुतळ्याचे डोकं कोयत्याने तोडायचे होते. मात्र, त्यापूर्वीच रेल्वे पोलिसांनी सुरजला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. (Crime news in Pune)

प्राथमिक माहितीनुसार, सुरज शुक्ला हा मूळचा उत्तर प्रदेशातील वाराणसीचा आहे. तो नोकरीसाठी पुण्यात आला होता. तो रुद्राक्षांच्या माळा आणि धार्मिक पुस्तकं विकण्याचे काम करतो. उत्तर प्रदेशातील कुंभमेळा संपल्यानंतर तो महाराष्ट्रात मुक्कामाला आला होता. काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील (Satara News) वाईत वास्तव्याला होता. त्याने अलीकडेच शहाळं फोडण्यासाठी कोयता (Koyta) विकत घेतला होता. तो वाईतून पुण्यात आला आणि त्याने पुतळ्याची विटंबना केली. सुरज शुक्ला याच्या मनात महात्मा गांधी यांच्याबद्दल पूर्वीपासूनच द्वेष होता. हा द्वेष रविवारी रात्री उफाळून आला. यानंतर सुरज शुक्ला याने महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावर हल्ला चढवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button