महाराष्ट्र

Pune Crime News: तोंडावर स्प्रे मारून अत्याचाराचा बनाव, पुरावे तयार करून पोलिसांची दिशाभूल; शहरातील 500 अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामाला, कोंढव्यातील ‘त्या’ तरूणीच्या अडचणी वाढल्या

Pune Crime News: पुण्यातील कोंढवा परिसरात कुरिअरबॉय म्हणून घरी आलेल्या तरुणाने तोंडावर केमिकल स्प्रे मारून बेशुद्ध केलं. त्यानंतर बेशुद्धावस्थेत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला होता.

पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरातील एका तरूणीने काही दिवसांपूर्वी बलात्काराची (Pune Crime News) खोटी माहिती देणं तरुणीच्या अंगलट आलं आहे. कोंढवा बलात्कार प्रकरणी खोटी माहिती दिल्याने तरुणीवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरूणीने पोलिसांकडे अशी खोटी तक्रार का केली? याबाबतची माहिती तिने अद्याप दिली नसल्याने तिच्यावर आता न्यायालयाच्या निर्णयानंतर तपास होणार आहे. 2 जुलैला घरामध्ये घुसून एका डिलवरी बॉयने बलात्कार केल्याची तक्रार या तरुणीने कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सर्वत्र तपास केला. पोलिसांनी 500 सीसीटीव्ही अनेक पोलीस कर्मचारी लावून तपास सुरू केला होता  त्यानंतर हा डिलिव्हरी बॉय नसून परस्पर सहमतीने दोघांनी स्वतःचे फोटो काढले आणि ते एकमेकांचे मित्र असल्याचे तपासात समोर आले.(Pune Crime News)

खोटी माहिती दिल्याप्रकरणी या तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर तपास सुरू करण्यात येणार आहे. तरुणीने कुठल्या उद्देशाने ही खोटी माहिती दिली त्यामागचा तिचा हेतू काय होता याचा तपास पोलीस करणार आहेत. पुढील काळात कुणीही खोटी तक्रार देऊन पोलिसांचा आणि प्रशासनाचा वेळ वाया जाईल त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यातील कोंढवा परिसरात कुरिअरबॉय म्हणून घरी आलेल्या तरुणाने तोंडावर केमिकल स्प्रे मारून बेशुद्ध केलं. त्यानंतर बेशुद्धावस्थेत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली; मात्र, पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात हा सर्व बनाव तरुणीनेच रचला असल्याचे समोर आले. घरी आलेली व्यक्ती कुरिअरबॉय नसून, त्या तरुणीचाच मित्र होता. हे पोलिस तपासात समोर आले. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी खोटी माहिती देणे, बनावट पुरावे तयार करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी ‘त्या’ तरुणीवर अदलखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरात 2 जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडल्याचे तरुणीने सांगितले होते. पोलिसांनी तिच्या मोबाईलमधील मेसेजेस, व्हॉटस्अॅपची तपासणी केली असता. तरुणीने स्वतःच व्हॉट्सअॅपद्वारे आरोप केलेल्या तरूणाला  घरी बोलावल्याचे समोर आले होते. 1 जुलै रोजी केलेल्या व्हॉटसअॅप चॅटप्रमाणे फिर्यादीने आरोपीला घरी कोणी नसताना जादा कपडे घेऊन येण्याबाबत सांगितले होते. तसेच येण्याच्या मार्गाबाबत ‘पूर्वीप्रमाणेच ये’ असेही सांगितलेले होते. त्यावरून आरोपी हा कुरिअर बॉय नसून तो फिर्यादीचा मित्र असल्याचे समोर आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button