महाराष्ट्र

MNS on Devendra Fadnavis: ‘स’ सत्तेचा… मनसेनं आता सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा ते सीएम फडणवीसांची ‘ती’ वक्तव्ये सुद्धा समोर आणली!

आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्यांचे बघायचे वाकून. सिंचन घोटाळा,आदर्श घोटाळा,महाराष्ट्र सदन घोटाळा केलेल्यांना पक्षात घ्यायचे त्यावेळी आशिष शेलार आणि भाजपाचा “स”सत्तेचा नसतो का? अशी विचारणाही केली आहे. 

MNS on Devendra Fadnavisमराठी विजयी मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. दोघांच्या एकत्र येण्याने किती राजकीय परिणाम होतील याची चर्चा सुरू असतानाच राज ठाकरेंना थेट टार्गेट न करता उद्धव ठाकरे यांच्यावरती मात्र शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून सडकून टीका सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी सुद्धा ठाकरे बंधूंवर टीका केली. या टीकेनंतर आता मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे बाळा नांदगावकर यांनी शेलार यांच्या टीकेचा समाचार घेतल्यानंतर आता नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे यांनी सुद्धा फडणवीस यांना त्यांच्या जुन्या वक्तव्यांची आठवण करून देत हल्लाबोल केला आहे.

फडणवीस यांची जुनी वक्तव्ये समोर आणली

‘स’ सत्तेचा म्हणत गजानन काळे यांनी फडणवीस यांची वक्तव्ये समोर आणली आहेत. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले म्हणत असे म्हणत शेअर केलेल्या पोस्टमध्ये वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, एकवेळ अविवाहित राहीन, पण एनसीपीसोबत युती करणार नाही, अजित पवार चक्की पिसींग, पिसींग, पिसींग, तुरुंगात खडी फोडायला पाठवणारच, या वक्तव्यांची आठवण करुन दिली आहे.

हे ठाकरेंना चँलेंज आहे की फडणवीसांच्या सरकारला?

गजानन काळे यांनी अन्य एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, जा मी मराठी बोलत नाही, मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा हे ठाकरे ना चँलेंज आहे की फडणवीसांच्या सरकारला? दक्षिण भारतातील राज्यांमधील भय्ये ही मुजोरी करू शकतात का? आणि बोललेच तर सरकार कोणाचेही असो तिथल्या शासनकर्त्यांनी तत्काळ याची दखल घेऊन कारवाई केली असती आणि बेड्या ठोकून त्या भय्याला अटक केली असती, पण आमचे लाचार सरकार ना केडिया वर कारवाई करत ना त्या भोजपुरी कलाकारावर ना त्या भोंदू स्वामी महाराजावर. आणि वर आम्ही पण कसे मराठी आहोत याचा टेंबा मिरवायला आशिष शेलार आणि नितेश राणे पुढे असतात. #नकलीमराठी. करा या भय्यांवर कारवाई नाहीतर मनसे त्यांची मराठीची शिकवणी घेईलच.

त्यावेळी आशिष शेलार आणि भाजपाचा “स”सत्तेचा नसतो का?

गजानन काळे यांनी अन्य एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्यांचे बघायचे वाकून. सिंचन घोटाळा,आदर्श घोटाळा,महाराष्ट्र सदन घोटाळा केलेल्यांना पक्षात घ्यायचे त्यावेळी आशिष शेलार आणि भाजपाचा “स”सत्तेचा नसतो का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button