महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule On Malegaon Blast Case Verdict: हिंदू धर्माला बदनाम करणाऱ्यांना कोर्टाची चपराक; आता काँग्रेसनं माफी मागावी, चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी

Chandrashekhar Bawankule On Malegaon Blast Case Verdict: मालेगाव प्रकरणी सत्य बाहेर आलं आहे. त्यामुळे आता काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

Chandrashekhar Bawankule On Malegaon Blast Case Verdict: मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपीना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असं एनआयएच्या विशेष न्यायालयाकडून सांगण्यात आले. 1000 पानांहून अधिक पानांचा निकाल असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी (Malegaon Blast Case Verdict) न्यायालयाने आज (31 जुलै) निकाल सुनावण्यात आला. मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल येताच विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मालेगाव प्रकरणी सत्य बाहेर आलं आहे. त्यामुळे आता काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका दीर्घकाळ चाललेल्या राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश आहे, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले. सर्व आरोपांमागे कोणताही ठोस पुरावा नाही, हे न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलं. पण याहून गंभीर बाब म्हणजे काँग्रेसनं जाणीवपूर्वक “हिंदू दहशतवाद” हा शब्दप्रयोग प्रचारात वापरत हिंदू समाजाला, श्रद्धेला, जगभरात बदनाम करण्याचा प्रयत्न केला. शतकानुशतकं मानवतेचं आणि सहिष्णुतेचं प्रतीक असलेल्या हिंदू धर्माला दहशतवाद्यांच्या रांगेत उभं करण्याचा अक्षम्य गुन्हा काँग्रेसने केला असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. आज कोर्टाने सत्य मांडलं, आता काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागायला हवी, अशी मागणी देखील चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. हिंदू कधीच दहशतवादी नव्हता आणि नसेलही…न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने हिंदूंना बदनाम करणाऱ्यांना मोठी चपराक मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button