महाराष्ट्र

Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड यांचा तडकाफडकी राजीनामा, महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याच्या नावाची उपराष्ट्रपतीपदासाठी चर्चा

Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी काल (21 जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजीनामा देताना त्यांनी पंतप्रधानांसह सर्व मंत्रीमंडळाचे आभार मानले. त्यांच्या कार्यकाळाची मुदत ऑगस्ट 2028 पर्यंत होती. मात्र, कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी राजीनामा सादर केल्याने चर्चांना उधाण आले आहे. पदावर असतानाच प्रकृतीच्या किंवा इतर कारणामुळे राजीनामा देऊ करणारे देशाचे पहिले उपराष्ट्रपती, अशी नोंद झालेले राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वीकारणार की नाही? हे लवकर स्पष्ट होणार आहे. तर धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला तर नवे उपराष्ट्रपती कोण होणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. यात महाराष्ट्रातील एका नेत्याचे नाव आघाडीवर आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. संसदेच्या सर्व सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम आणि विश्वास नेहमीच माझ्या आठवणीत राहील. देशाच्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला अनेक अनुभव मिळाले यासाठी मी मनापासून आभारी आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आणि अभूतपूर्व विकासाचे साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी असणे ही समाधानाची बाब आहे, असे धनखड यांनी म्हटले आहे. हे पद सोडताना भारताचा जागतिक पातळीवर झालेल्या उदयाचा आणि देशाच्या अभूतपूर्व कामगिरीचा मला अभिमान आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल असेल, असा मला विश्वास आहे. मी मनापासून आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो, असे धनखड यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button