Eknath Shinde: मुंबईत अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदेंनी गुपचूप दिल्ली गाठली, भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी, राजकीय वर्तुळात खळबळ

Eknath Shinde Delhi Visit: मुंबईत अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदेंनी काल दिल्ली दौरा केला यावेळी त्यांनी केंद्रातील अनेक बड्या नेत्यांची भेट घेतल्याची माहिती आहे.
मंबई: मुंबईत अधिवेशन सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुपचूप दिल्ली गाठली. दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या गाठीभेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिल्लीवारी आणि केंद्रीय नेत्यांच्या भेटीमागचं कारण गुलदस्त्यात आहे. शिंदेंनी अचानक केलेल्या या दिल्लीवारीमुळे नेत्यांच्या भुवया उंचावल्या असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान नियोजित असलेल्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांना आणि इतर नेत्यांना पाठवल्याची माहिती आहे. तर या दौऱ्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र यागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
अनेक पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केले
एकनाथ शिंदे यांनी काल (बुधवारी) दिल्लीचा दौरा केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी केंद्रातील अनेक बड्या नेत्यांशी भेट घेतली. मात्र, या दिल्लीवारीमागचं आणि केंद्रीय नेत्यांच्या भेटीमागचं नेमकं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. ‘दिल्लीवारी नेमकी कशासाठी हे अजून कळू शकलेलं नसलं तरी या दौऱ्यामुळे एक विशेष महत्त्व आलेलं आहे,’ अशी माहिती समोर आली आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू असताना आणि अनेक महत्त्वाची विधेयकं मांडली जात असताना हा दिल्ली दौरा झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपले अनेक पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केले आणि त्याऐवजी उदय सामंत किंवा इतर नेत्यांना पाठवले होते. सुनील प्रभू यांच्यासह 50 नेत्यांची भेट घेतल्याची माहितीही समोर आली आहे. या भेटीगाठी आणि अचानक केलेल्या दिल्ली दौऱ्यामागचं कारण स्पष्ट होणं बाकी आहे.