Disha Patani Sister On Aniruddhacharya: ‘तोंड मारणं काय असतं, ते मी याला समजावते…’; दिशा पाटनीच्या बहिणीचा संताप, अनिरुद्धाचार्यांना खडसावलं

Disha Patani Sister On Aniruddhacharya: अनिरुद्धाचार्य यांच्या अश्लील टिप्पणीवर खुशबू पाटनीनं दिलेली रिअॅक्शन सध्या व्हायरल होत आहे. तसेच, अनेक युजर्सही तिचं समर्थन करत आहेत.
Disha Patani Sister On Aniruddhacharya: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) दिशा पाटनीची (Disha Patani) बहीण आणि माजी लष्करी अधिकारी खुशबू पाटनीनं अध्यात्मिक गुरू आणि कथाकार अनिरुद्धाचार्य महाराजांना (Spiritual Teacher And Storyteller Aniruddhacharya Maharaj) खडे बोल सुनावले आहेत. खुशबूनं लिव्ह-इन रिलेशनशिपवरील त्यांच्या टिप्पणीवर जोरदार टीका केली. अनिरुद्धाचार्य यांच्या अश्लील टिप्पणीवर खुशबू पाटनीनं दिलेली रिअॅक्शन सध्या व्हायरल होत आहे. तसेच, अनेक युजर्सही तिचं समर्थन करत आहेत.
कथावाचक अनिरुद्धाचार्य एका व्हिडीओमध्ये बोलताना म्हणाले की, “मुले 25 वर्षांच्या मुलींना घेऊन येतात, ज्या 4-5 ठिकाणी तोंड मारुन येतात.” त्यांची टिप्पणी व्हायरल होताच, खुशबूनं त्यावर प्रतिक्रिया दिली आणि म्हणाली, “जर तो माझ्यासमोर असता तर, मी त्याला समजावून सांगितलं असतं की, तोंड मारणं म्हणजे काय असतं…? हे राष्ट्रविरोधी आहे. तुम्ही अशा उच्च श्रेणीतील बदमाशांना पाठिंबा देऊ नका. या समाजातील सर्व नपुंसक लोक त्याचं अनुसरण करतात…”
खुशबू पाटनी पुढे बोलताना म्हणाली की, “समाजातील नामर्द याला फॉलो करतात. म्हणतो की, मुली ज्या लिव्ह-इनमध्ये राहतात, तोंड मारुन येतात… तो असं का नाही म्हणाला ती, मुलं जी लिव्ह-इन मध्ये राहतात, ते तोंड मारतात. मुली काय एकट्याच लिव्ह-इनमध्ये राहतात? आणि लिव्ह-इनमध्ये राहणं चुकीचं आहे?




