महाराष्ट्र

उंची पेग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, डोळे कोणासाखे माहीत नाहीत, एक कोण तो बाप ठरवा पहिल्यांदा; उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंची खिल्ली उडवली

उद्धव ठाकरे यांनी सातत्याने वैयक्तिक पातळीवर घसरून टीका करणाऱ्या मंत्री नितेश राणेंची चांगलीच खिल्ली उडवली. त्यांच्या बाप वक्तव्याचा सुद्धा त्यांनी ठाकरी शैलीत समाचार घेतला.

Uddhav Thackeray mocks Nitesh Raneशिवसेनेचा 59 वा वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक  स्वराज संस्था निवडणुकीसाठी रणशिंग फुंकत जाहीर आव्हान दिले. कम ऑन किल मी, हिंमत असेल तर अंगावर या, फक्त येताना अॅम्ब्युलन्स घेऊन या… येताना सरळ याल, पण जाताना आडवे होऊन जाल, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.

कोणता तरी एक बाप ठरवा

शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला. देशाला आज पंतप्रधानाची गरज आहे, देशाला पंतप्रधान कुठे आहे? फक्त भाजपला आहे. देशाला आज गृहमंत्र्यांची गरज आहे, घरफोड्या अमित शाहांची नाही. देशाला संरक्षणमंत्र्यांचीही गरज आहे, गुंडांना अभय देणाऱ्या राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीसांची नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती कदापि होऊ देणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बजावतानाच, हिंमत असेल तर गुजरातमध्ये सक्ती करून दाखवा, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. गद्दार मिंध्यांचा समाचार घेतानाही त्यांनी उघड आव्हान दिले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सातत्याने वैयक्तिक पातळीवर घसरून टीका करणाऱ्या मंत्री नितेश राणेंची चांगलीच खिल्ली उडवली. त्यांच्या बाप वक्तव्याचा सुद्धा त्यांनी ठाकरी शैलीत समाचार घेत एक कोण तो बाप ठरवा पहिल्यांदा, अशा शब्दात मी त्यांना सांगत असल्याचे ते म्हणाले.

उंची पेग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा

उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या हिंदू-मुस्लिम भांडणे लावली जात आहेत. भाजपचा एक बेडूक ओरडत आहे. त्याला तेवढंच काम दिलेलं आहे. तुझी उंची किती, तुझा आवाज कसा, उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावताच एकच हशा पिकला. डोळे कोणासारखे आहेत माहीत नाही, असे ते म्हणताच नेपाळी, नेपाळी असे आवाज आले. त्यावर पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, तुझा जीव काय, तू बोलतोस काय? तुझी पार्श्वभूमी काय? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय? आणि शिवसेनेवर बोलतोस. पुढे बोलताना कोणता तरी एक बाप ठरवा, याच भाषेत मी त्यांना बोलतोय हे त्यांना कळू द्या. शिवसेना 59 वर्षांची झाली. तरीही आमचा नेता एकच. भगवा एकच, दैवत, विचार एकच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button