Nitesh Rane on Uddhav Thackeray : राजकीय लव्ह जिहाद झाल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे; नितेश राणेंचा हल्लाबोल

Nitesh Rane on Uddhav Thackeray : शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.
Nitesh Rane on Uddhav Thackeray : शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. नितेश राणे यांची तुलना उद्धव ठाकरे यांनी पेंग्विन आणि बदकाशी केली होती. आता उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार पलटवार केला आहे.
नितेश राणे म्हणाले की, ज्यांना मी जिहादी हृदयसम्राट म्हणतो, त्यांच्याकडून हिंदू समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्या शापच भेटणार आहे. शेवटी त्यांना त्यांच्या मौलवींना खुश करायचे आहे. मी हिंदुत्वाचं काम करणारा एक कार्यकर्ता आहे. समाजाच्या संरक्षणासाठी काम करणारा एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचं काम तुम्हाला खटकतं आहे. ते पण बाळासाहेबांच्या मुलाला खटकतं आहे. कुणी हिंदू समाजासाठी उभं राहतंय, हे त्यांना खटकतंय हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा अपमान आहे. हे उद्धव ठाकरेंना कळत नाही. ठाकरे ब्रँड संपला ही जी ओरड घालत आहेत. हिंदुत्वाचे हात सोडले म्हणूनच ठाकरे ब्रँडला हे दिवस आलेले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
नितेश राणे पुढे म्हणाले की, स्वतःचा मुलगा असाच असल्याने त्यांना बाकी सगळे असेच दिसणार. पेंग्विन, कोंबड्या असेच दिसणार. स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे. बाई आहे की पुरुष आहे हे लोकांना कळत नाही. आमचं तोंड उघडायला लावू नका. पहिले स्वतःच्या मुलाची अवस्था बघा. हा राग माझ्यावर येणे अपेक्षित आहे. कारण मी डिनो मॉरिओबद्दल माहिती देत आहे. दिशा सालियनबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणून नितेश राणे तुम्हाला खटकणारच आहे. स्वतःच्या मुलाची थेरं कमी केली असती, नाईट लाईफवर थोडा कंट्रोल ठेवलास असता तर आज इतक्या शिव्या दुसऱ्यांना देण्याची गरज भासली नसती. मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचे काम करतो आहे. हिंदू समाजाचे काम करतो आहे. हिंदूंच्या गब्बरची दखल घेतली का नाही, असा टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना लगावला.
राजकीय लव्ह जिहाद झाल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे
मुंबई, महाराष्ट्र, हिंदुत्वाचा काय संबंध आहे? तुम्ही स्वतःचा वर्धापन दिन पाकिस्तानात, इस्लामाबाद, कराचीमध्ये साजरा करा. तुम्ही तिकडचेच आहेत. आता राजकीय धर्मांतर झाल्याचे उत्तम उदाहरण, राजकीय लव्ह जिहाद झाल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे आहेत, असा हल्लाबोल देखील नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यातून नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, सध्या हिंदू-मुस्लिम भांडणे लावली जात आहेत. भाजपचा एक बेडूक ओरडत आहे. त्याला तेवढंच काम दिलेलं आहे. तुझी उंची किती, तुझा आवाज कसा, उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावताच एकच हशा पिकला. डोळे कोणासारखे आहेत माहीत नाही, असे ते म्हणताच नेपाळी, नेपाळी असे आवाज आले. त्यावर पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, तुझा जीव काय, तू बोलतोस काय? तुझी पार्श्वभूमी काय? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय? आणि शिवसेनेवर बोलतोस. पुढे बोलताना कोणता तरी एक बाप ठरवा, याच भाषेत मी त्यांना बोलतोय हे त्यांना कळू द्या. शिवसेना 59 वर्षांची झाली. तरीही आमचा नेता एकच. भगवा एकच, दैवत, विचार एकच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.