महाराष्ट्र

खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं, मुंबईत येऊन अमित शाहंनी ठणकावून सांगितलं

खरी शिवसेना कोणची याचा परिचय एकनाथ शिंदे यांनीच करुन दिल्याचे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले.

Amit Shah : खरी शिवसेना कोणाची यावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु असतात. अशातच आता यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी उडी घेतली आहे. खरी शिवसेना कोणची याचा परिचय एकनाथ शिंदे यांनीच करुन दिल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी करुन दिला आहे.  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हादेखील डबल इंजिन सरकार होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले, परत डबल इंजिन सरकार आल्याचे अमित शाह म्हणाले.

महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या डबल इंजिन सरकारने मोदीजींच्या नेतृत्वात 7 लाख कोटीहून अधिक गुंतवणूक करुन मुंबईला वाचवण्याचे काम केल्याचे अमित शाह म्हणाले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (MACCIA) च्या नवनिर्मित मुख्यालयाच्या इमारतीचे आणि मुंबईत राज्यस्तरीय सहकारी औद्योगिक परिषदेचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अनेक वर्षापासून महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्राचं नेतृत्व करत असल्याचे अमित शाह म्हणाले.  त्यामुळंच मुंबईनगरीला देशाची आर्थिक राजधानी म्हणले जाते.

देशातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था महाराष्ट्राची

देशातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे. एफडीआयमध्ये सगळ्यात जास्त हिस्सा महाराष्ट्रात आहे. सगळ्यात जास्त विदेशी पर्यटक महाराष्ट्रात, सगळ्यात जास्त स्टार्टअप महाराष्ट्रात जास्त असल्याचे अमित शाह म्हणाले. भारताचे सगळ्यात मोठे बंदर वाडवनमध्ये तयार होत आहे. येणाऱ्या काळात मुंबईचे काय होणार याची मला चिंता होती. कारण वाढत लोकसंख्या असेल, वाढती झोपडपट्टी, ट्रॅफिकची समस्या होती. पण मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करेल असे अमित शाह म्हणाले. त्यांनी पहिल्या सरकारच्या कार्यकाळात मुंबईच्या विकासासाठी सात लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे अमित शाह म्हणाले.

यावेळी बोलताना अमित शाह यांनी काँग्रेसवर देखील टीका केली. किती वर्ष झालं तुमच्याकडे महाराष्ट्र होता. तुम्ही काय केले? मुंबईसाठी तुम्ही काय केले? असा सवाल अमित शाह यांनी केला. देशात विमानतळांची संख्या वाढली आहे. रेल्वे वाढल्या आहेत. मेट्रो झाली आहे असे अमित शाह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात मोठं काम झाल्याचे अमित शाह म्हणाले. औद्योगिक विकासासाठी निधी दिला, त्याचबरोबर जलसिंचनासाठी अनेदान दिल्याचे अमित शाह म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra Politics: बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेना फोडणाऱ्या अमित शाहांवर जीवनभर आठवण राहील असे कडक उपचार झाले असते: सामना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button