महाराष्ट्र

Devendra Fadnavis: कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सांगत रस्ता खोदून टाकला; वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीसांनी झापले

Devendra Fadnavis: आलापल्ली-सिरोंचा या 353 डी राष्ट्रीय महामार्गावरील तमनदाला फाटा ते अमडेली एक किलोमीटर रस्ता गिट्टी टाकून तयार करण्यात आला होता.

Devendra Fadnavis गडचिरोली: वनकायद्याचा दाखला देत गडचिरोलीमधील (Gadchiroli) दुर्गम भागातला रस्ता खोदणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. बापाचा माल आहे का?, असा थेट सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आलापल्ली-सिरोंचा या 353 डी राष्ट्रीय महामार्गावरील तमनदाला फाटा ते अमडेली एक किलोमीटर रस्ता गिट्टी टाकून तयार करण्यात आला होता. मात्र वनकायद्याचे उल्लंघन झाल्याचे सांगत नांगरणीचे ट्रॅक्टर लावून रस्ता खोदून टाकण्यात आला होता. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत हा काय प्रकार आहे?, असं म्हणत अधिकाऱ्यांना झापलं. संबंधित कार्यलयात जाऊन पत्र व्यवहार करा असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावत रस्ता तयार करा, त्रुटी काढत बसू नका असे निर्देश देवेंद्र फडणवीसांनी दिले.

गडचिरोलीत मुक्कामी राहणारे पहिलेच मुख्यमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीत मुक्कामी आहेत. इथे मुक्कामी राहणारे कदाचित ते पहिलेच मुख्यमंत्री असून त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री असताना ते दुसऱ्यांदा नक्षलग्रस्त गडचिरोलीत मुक्कामी आहे. यापूर्वी 2019 च्या निवडणुकीदरम्यान ते गडचिरोली येथे मुक्कामी राहिले होते. गडचिरोली पोलीस दलाच्या रेस्ट हाऊस मध्ये त्यांचा मुक्काम असून उद्या कुठलाही कार्यक्रम गडचिरोली येथे आयोजित नसताना ते गडचिरोलीत मुक्कामी असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मोर्चे बांधणी आणि पक्ष अंतर्गत असलेली गटबाजी दूर करण्यासाठी तर हा मुक्काम नाही ना असे बोलले जात आहे.

आत्मसमर्पित 13 नक्षलवादी युवक-युवतींचं शुभ मंगल-

गडचिरोली पोलीस दलातर्फे आत्मसमर्पित नक्षलवादी युवक युवतींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा आगळावेगळा लग्नसोहळा संपन्न होत आहे. जवळपास 13 आत्मसमर्पित नक्षल युवक युवती या विवाह सोहळ्यातून लग्न बंधनात अडकणार आहेत. तत्पूर्वी गडचिरोली पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे पोलीस मुख्यालय परिसरातून वर-वधुंची वाजत जागत वरात काढण्यात आली. या वरातीत पोलीस कर्मचारी वऱ्हाडी बनवून सहभागी झाले होते. विवाह बंधनात अडकणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नक्षली गिरीधरसह नक्षल युवक-युवतींनी या लग्न सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button