Pune Crime news: पिंपरी-चिंचवडमध्ये नवऱ्याने बायकोला प्रियकारासह पाहिलं, डोक्यात संतापाची तिडीक गेली, रस्त्यावरच्या पेव्हर ब्लॉकने दोघांना संपवलं

Pimpri chinchwad crime news: पिंपरी चिंचवड शहरातील देहू रोड येथे एका नवऱ्याने त्याची बायको आणि प्रियकाराला संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. देहू रोड परिसरात काय घडलं?
Pimpri chinchwad Crime Murder news: पिंपरी चिंचवडलगतच्या देहू रोड परिसरात विवाहित महिला आणि प्रियकराची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली. महिलेचा दुसऱ्या पतीने ही हत्या (Murder News) केल्याची माहिती समोर आली आहे. अटकेतील पती ज्ञानेश्वर साबळे हा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध (extra marital affair) सुरु असतानाच पतीने पाहिले. यातून मध्यरात्री साबळेने पत्नी आणि तिच्या प्रियकराची सिमेंट ब्लॉकने ठेचून हत्या केली.
ज्ञानेश्वर साबळे हा लेबर कॉन्ट्रॅक्टर होता. त्याच्या पत्नीचा प्रियकर मजुरीचे काम करायचा. साबळेच्या पत्नीचा आधी एक विवाह झाला होता, पहिल्या पतीकडून दोन मुलं ही झाली होती. मात्र त्या पतीच्या मृत्युनंतर तिने साबळेशी लग्न केलं होतं. मात्र कालांतराने तिचे विवाहबाह्य संबंध निर्माण झाले. याची कल्पना साबळेला होतीच मात्र मध्यरात्री त्याला पुरावा सापडला. राहत्या घरापासून लगतच्या परिसरात हे दोघे आढळले. यानंतर संतापलेल्या ज्ञानेश्वर साबळेने या दोघांची हत्या केली. देहूरोड पोलिसांनी साबळेला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. यामधून आता आणखी कोणती नवी माहिती समोर येणार, हे बघावे लागेल.
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाघळूद येथील अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोक्सो सह विनयभंग, यासह विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशिमच्या शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाघळुद येथील अल्पवयीन मृत तरुणीचा गावातील आरोपी अभिषेक विष्णू देशमुख याने तरुणीच्या घरामध्ये घुसून तिचा विनयभंग करत, ‘माझ्यासोबत लग्न कर अन्यथा जिवाने मारून टाकू’, अशी धमकी दिल्यामुळे तरुणीने विषारी औषध प्राशन केले. दरम्यान उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मयत तरुणीच्या नातेवाईकांनी शिरपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन. शिरपूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध कलमातंर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार असल्याची माहिती कळते. याप्रकरणात आता पोलीस पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.