Laxman Hake : अजित पवारांचा पोरगा पडला, पार्थला पडलेल्या मतावरुन त्याची लायकी शोधणार का? लक्ष्मण हाकेंचा अमोल मिटकरींना सवाल

Laxman Hake Vs Amol Mitkari : आम्ही जर मिटकरीला त्याच भाषेत उत्तर दिलं तर त्याचे आणि अजित पवारांचे कपडेही राहणार नाहीत असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला.
पुणे : ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद वाढतानाच दिसत आहे. लक्ष्मण हाकेंना विधानसभेमध्ये फक्त 527 मतं पडली होती, त्यांनी अजित पवारांवर टीका करू नये असं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं होतं. त्यावर लक्ष्मण हाके यांनी उत्तर दिलं आहे. अजित पवारांचा पोरगा निवडणुकीत पडला, मग त्याच्या मतावरुन त्याची लायकी शोधायची का असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे हा वाद आता पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे.
Laxman Hake On Parth Ajit Pawar : काय म्हणाले लक्ष्मण हाके?
अजित पवार हे पोल्ट्री फार्म वाले आहेत. त्यांनी ओबीसींचा निधी अडवला अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली होती. आता त्यांनी पार्थ पवार यांच्यावरही टीका केली. अजित पवारांचा मुलगा निवडणुकीत पडला. पार्थ पवार यांना पुन्हा राजकारणात आणता आलं नाही. त्याला पडलेल्या मतावरुन त्याची लायकी शोधायची का असा प्रश्न लक्ष्मण हाकेंनी केला.
Laxman Hake On Ajit Pawar : तर अजितदादांचे कपडेही राहणार नाहीत
अमोल मिटकरीला बाजारु विचारवंत असे म्हटले जाते. मिटकरी अजितदादांच्या घरी झाडू मारतात, त्याबदल्यात त्यांना आमदारकी मिळाल्याची टीका या आधी लक्ष्मण हाके यांनी केली होती. आम्ही जर मिटकरीला त्याच भाषेत उत्तर दिले तर त्याचेही कपडे राहणार नाहीत आणि अजितदादांची देखील कपडे राहणार नाहीत असे हाके म्हणाले होते.
Amol Mitkari On Laxman Hake : काय म्हणाले होते अमोल मिटकरी?
लक्ष्मण हाकेंच्या या टीकेवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं. आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत आपलं डिपॉझिट गमावणारे लक्ष्मण हाके ओबीसींचे नेते कसे? असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी केला.
‘लक्ष्मण हाकेला आतापर्यंत लढलेल्या निवडणुकांमध्ये किती मत मिळाली हे त्यांनं पाहावं. तुझ्याजवळ असलेली गाडी तू स्वतः घेतली की जनतेने दिली, हे तू खरं जनतेला सांगावं. 2014च्या निवडणुकीत त्याने निवडणूक लढण्यासाठी एका वकिलाकडून 50 हजार रुपये घेतले होते. त्यावेळी तुला फक्त 527 मत विधानसभेत मिळाली होती’ अशा शब्दात आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.
पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “अजितदादांशी तुलना करताना आपली औकात लक्ष्मण हाकेने पहावी. त्याला जास्त भाव देण्याची गरज नाही. मराठा ओबीसी वाद निर्माण करण्यात लक्ष्मण हाके तुझा ही खारीचा वाटा आहे. तू ओबीसीसाठी काय केलं ते जनतेला सांग? मी आमदार झाल्यावर माझ्या गावात माझी ग्रामपंचायत निवडून आणली. जिल्हा परिषदेत पराभूत झालो, तरी सन्मानजनक मते मिळवली. तुला आतापर्यंतच्या सर्व निवडणुकीत मिळून साडेसहा हजारावर मते मिळाली नाहीत. लक्ष्मण हाके भूंकत राहिला तर मी त्याच्या विरोधात नक्कीच बोलेल. मी त्याच्या अंगावर त्याचे अंतर्वस्त्र पण शिल्लक ठेवणार नाही. तुला तुझ्या औकातीतच उत्तर द्यावे लागेल.”