हार्ट अटॅकनंतर अपघात, 15 मिनिटे ह्रदय बंद पडूनही युवकाचा जीव वाचला; डॉक्टर म्हणाले, जणू चमत्कारच…

चारचाकी गाडी चालवताना हार्ट अटॅक आल्याने अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची घटना घडली होती.
नवी मुंबई : आयुष्य हे क्षणभृंगुर आहे, असं म्हणतात. कारण, कधी काही होईल हे कुणीही सांगू शकत नाही. अनेकदा खेळता खेळता, किंवा बसल्या जागेवर ह्रदयविकाराचा झटका येऊन काहींचे प्राण गेल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र, त्याचबरोबर देव तारी त्याला कोण मारी.. असेही प्रसंग अनुभवले आहेत. मोठ्या अपघातातून किंवा संकटातून जीव वाचल्याचेही उदाहरणं आहेत. आता, नवी मुंबईतील (Navi mumbai) तळोजा येथील एका 32 वर्षीय युवकासोबतही अशीच घटना घडली आहे. हर्ट अॅटक आल्याने अनिकेत नलावडे यांचे ह्रदय चक्क 15 मिनिटे बंद पडले होते. मात्र, सुदैवाने रुग्णालयात (Hospital) त्यांचा जीव वाचला आहे. विशेष म्हणजे गाडी चालवताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने अपघात (Accident) झाला होता, या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
चारचाकी गाडी चालवताना हार्ट अटॅक आल्याने अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे हर्ट अटॅक आलेल्या अनिकेत नलावडे यांचे हृदय आणि बीपी 15 मिनिटांपर्यंत बंद राहूनही 32 वर्षीय युवकाचे प्राण वाचले आहेत. तळोजा येथील 32 वर्षीय रहिवाशी अनिकेत नलावडे यांना गाडी चालवताना हार्ट अटॅक आल्याने झालेल्या अपघातात दुर्देवाने एकाचा मृत्यू झाला. मात्र, या अपघातात 15 मिनिटांच्या वर हृदय आणि बीपी पुर्णपणे बंद राहून अनिकेत नलावडे यांचा चमत्कारिकरित्या जीव वाचलेला आहे. घरात छातीत दुखायला लागल्यानंतर अनिकेत नलावडे पत्नीला घेऊन कार चालवत हॅास्पीटलमध्ये जात होते. पण, कळंबोली जवळ पोहोचताच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी झालेल्या अपघातात त्यांनी बाईकस्वराला उडवले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे.