Uncategorized
संतोष जाधव यांना विशेष समाज रत्न पुरस्कार जाहीर
लक्ष प्रभा वृत्तसेवा अर्जुनवाड /येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष वामन जाधव यांना भीम कायदा सामाजिक संघटना पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने विशेष समाज रत्न पुरस्कार जाहीर आला आहे संतोष जाधव हे अनेक वर्षापासून समाजातील तळागाळातील नागरिकांचे प्रश्नन उडवण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत सामाजिक न्याय शिक्षण आरोग्य आणि हक्काच्या प्रशनांवर ते नेहमीच पुढाकार घेतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक अपेक्षित गटाना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे विशेषता वंचित आणि दुर्बल घटकासाठी ते नेहमीच तत्पर असतात