श्री अर्जुनेश्वर पाणीपुरवठाच्या चेअरमनपदी राजेंद्र हेगाण्णा व्हाईस चेअरमनपदी सुभाष मगदूम
लक्ष प्रभा वार्ताहर /अर्जुनवाड येथील श्री अर्जुनेश्वर पाणीपुरवठा मंडळीच्या चेअरमनपदी राजेंद्र हेगाण्णा व व्हाईस चेअरमनपदी सुभाष मगदूम यांची निवड करण्यात आली. या विशेष सभेचे अध्यक्षस्थानी सहायक निबंध कार्यालयाचे सहाय्यक निरीक्षक पी जे मेश्राम होते.
श्री अर्जुनेश्वर पाणीपुरवठा मंडळी या संस्थेच्या चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाची निवड मंगळवारी संस्थेच्या सभागृहात विशेष सभा घेऊन करण्यात आली. सुरुवातीला राजेंद्र हेगाण्णा यांनी चेअरमन पदासाठी अर्ज भरले तर व्हाईस चेअरमन पदासाठी सुभाष मगदूम यांनी अर्ज भरले. या दोघांचा एकमेव अर्ज आल्याने यांची निवड बिनविरोध करण्यात आली. आणि यावेळी मावळते चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीने समर्थकांनी जल्लोष केला.
यावेळी माजी चेअरमन रवींद्र सूर्यवंशी, माजी व्हाईस चेअरमन श्रीशैल्य हेगाण्णा, शिवगोंडा पाटील, नागेश हेगाण्णा, सचिन सूर्यवंशी, राजेंद्र मगदूम, आकाताई काळे, मालूताई मगदूम, सचिव अरुण फडतारे, कर्मचारी विजय यादव, राजेंद्र गुरव तसेच सर्व सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते