1 वाटी आमरस आणि 1 मोदक खायला दीड कोटी खर्च केला, पण शेतकऱ्यांसाठी… राजू शेट्टींचा हल्लाबोल

सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या घरी एक वाटी आमरस आणि एक मोदक खायला 1.5 कोटी खर्च केला, तिथे हेलिपॅड बनवले असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली.
Raju Shetti : सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या घरी एक वाटी आमरस आणि एक मोदक खायला 1.5 कोटी खर्च केला, तिथे हेलिपॅड बनवले असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti ) यांनी सरकारवर टीका केली. सरकारला लाज वाटत नाही. हजारो कोटी तिकडे खर्चात करता आपण शेतकऱ्यांसाठी एक रुपयाही देत नाही असे शेट्टी म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगड दौऱ्यावर आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीदिनाचा कार्यक्रम शाह यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. यानंतर त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजन केले होते. याच स्नेहभोजनासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली होती. अमित शहा हे रायगडवरील कार्यक्रम आटोपून तटकरे यांच्या सुतारवाडीतील घरी जेवणासाठी गेले. जाताना रायगडावरून 20 किलोमीटर असलेल्या सुतारवाडीत ते हेलिकॉप्टरने उतरले. हेच हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी 4 युनिटचे हेलिपॅड तयार करण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. यासाठी 7 एप्रिल रोजी 1 कोटी 39 लाख रुपयांचे टेंडरही काढले होते. एका वर्तमानपत्रात 9 एप्रिल रोजी हे टेंडर छापूनही आले होते, असे त्यांनी सांगितले होते. याच मुद्यावरुन शेट्टींनी सरकारवर टीका केली.
सरकारनं कांद्याला सरसकट 1500 रुपये हमी भाव द्यावा
महायुती सरकारने निवडणुकींपूर्वी कर्ज माफीची घोषमा केली होती त्याचं काय झालं असा सवाल शेट्टी यांनी केला. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत होत नाही असेही शेट्टी म्हणाले. मंत्रालयात आम्ही कांदे घेऊन आंदोलन केले. जेलमध्ये गेलो. उशिरा पण सरकारला शहाणपण आले. कांद्याचे निर्यात शुल्क रद्द केले. वेळेवर कांदा निर्यात शुल्क रद्द न केल्याने भाव पडले ही जबाबदारी सरकारची असल्याचे शेट्टी म्हणाले. सरकारनं कांद्याला 1500 रुपये हमी भाव द्यावा, आमचा नाफेडवर भरोसा नाही. 1500 रुपये सरसकट हमी भाव द्यावा असे शेट्टी म्हणाले.
परभणी जिल्ह्यात 1.50 लाख रुपयांच्या कर्जापायी शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच रात्री त्याच्या पत्नीने पण आत्महत्या केली ती महिला 7 महिन्याची गरोदर होती असे शेट्टी म्हणाले.