महाराष्ट्र ग्रामीण

Pahalgam Terror Attack : स्वतःचा जीव धोक्यात घालून आमचे प्राण वाचवले, नजाकत भाईंच्या उपकाराची परतफेड कधीही करू शकणार नाही; पहलगाम हल्ल्यानंतर भाजप नेत्याची पोस्ट चर्चेत

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावेळी स्थानिक रहिवासी नजाकत अली यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवले.

Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील (Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे मंगळवारी (दि. 22) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा छत्तीसगडमधील (Chhattisgarh) चिरमिरी येथील चार कुटुंबांचा एक गट पहलगाममध्ये उपस्थित होता. परंतु स्थानिक रहिवासी नजाकत अली यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या लोकांचे प्राण वाचवले. आता यातून बचावलेले भाजप (BJP) नेते अरविंद अग्रवाल (Arvind Agrawal) यांनी नजाकत अली यांचे फेसबुकवर (Facebook) पोस्ट करत विशेष आभार मानले आहेत.

छत्तीसगड येथील अरविंद अग्रवाल हे भाजप युवा मोर्चाशी संबंधित आहेत आणि भाजपचे सक्रिय सदस्य आहेत. मंगळवारी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला तेव्हा अरविंदचे कुटुंब एका गटासह काश्मीरला गेले होते. या हल्ल्यादरम्यान, नजाकत अली (Nazakat Ali) हे अग्रवाल यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींना काश्मीरच्या दौऱ्यावर घेऊन गेले होते. नजाकत अली यांनी  स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वांचे प्राण वाचवले आहेत.

उपकाराची परतफेड कधीच करू शकणार नाही

अरविंद अग्रवाल यांनी आता घरी पोहोचल्यानंतर नजाकत अली यांचे विशेष आभार मानले आहेत. अरविंद अग्रवाल यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर लिहिले की, “तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून आमचे प्राण वाचवले. नजाकत भाईंच्या उपकाराची परतफेड आम्ही कधीही करू शकणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, काश्मीर जे आपले आहे ते आपल्या सर्वांचे आहे, मी लवकरच परत येईन, असे त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

भाजप नगरसेवकाचाही जीव वाचला

दरम्यान, या हल्ल्यात नजाकत अली यांनी केवळ अरविंद अग्रवाल (Arvind Agrawal) आणि त्यांच्या कुटुंबाचे प्राण वाचवले नाहीत तर चिरमिरी महानगरपालिकेच्या भाजप नगरसेवक पूर्वा स्थापक (Purva Sthapak) आणि त्यांचे पती कुलदीप स्थापक (Kuldeep Sthapak) यांचेही प्राण वाचवले आहे. यानंतर, नजाकत अली यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button