महाराष्ट्र

Pahalgam Attack: मोबाईलचा डंप डेटा ठरणार महत्त्वाचा क्लू, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा माग काढण्यासाठी NIA अॅक्शन मोडमध्ये

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुन्ह्याच्या ठिकाणाचे डिजिटल मॅपिंग केले असून NIA ने घटनास्थळावरून गोळा केलेले नमुने आता न्यायवैदयक प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहे.

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu & Kashmir) पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला आज (28 एप्रिल) आठवडा पूर्ण झाला आहे. तर दुसरीकडे या भ्याड हल्ल्याच्या प्रकरणात अनेक पैलू समोर येत आहे. अशातच या प्रकरणाच्या तपासाला आता  अधिक वेग प्राप्त झाला आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) गुन्ह्याच्या ठिकाणाचे डिजिटल मॅपिंग केले असून NIA ने घटनास्थळावरून गोळा केलेले नमुने आता न्यायवैदयक प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहे. तसेच बैसरन व्हॅलीला जाणाऱ्या रस्त्यांवरील हॉटेल आणि मार्केट परिसरातील CCTV ही ताब्यात घेतले असून त्याची तपासणी सध्या सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

दहशतवाद्यांकडून पर्यटकांचा मोबाइल हिसकवण्याचा प्रयत्न-NIA

तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या दिवशी बैसरन व्हॅलीत चीनमध्ये बनवलेले सॅटलाईट फोन सक्रिय असल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय हे मोबाईल फोन तस्करी करुन आणले होते, असेही तपासात पुढे आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर घटनास्थळावरून सापडलेली रिकामी काडतूसं न्यायवैदक प्रयोगशाळेला पाठवली असून बॅलिस्टिक तपासणीतून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या शस्त्राचा प्रकार उघडकीस येऊ शकतो. असेही सांगण्यात येतंय. हल्याच्यावेळी बैसरन व्हॅली या ठिकाणी सक्रिय असलेल्या मोबाइलचा डंप डाटा काढण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. तर दहशतवाद्यांनी काही पर्यटकांचा मोबाइल हिसकावल्याचे ही  तपास यंत्रणेच्या तपासात समोर आली आहे. तर दुसरीकडे प्रत्यक्षदर्शी जखमी यांचेही  जबाब NIA कडून नोंदवले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे पहलगाम येथील दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये सातत्याने चकमकी होत आहेत.

अशातच 27-28 एप्रिल 2025 च्या रात्री, कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यांसमोरील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी विनाकारण लहान शस्त्रांनी गोळीबार सुरू केलाय. याला भारतीय सैन्यानेही जलद आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले असल्याची माहिती भारतीय सैन्याने दिली आहे. निवेदन सादर करत त्यांनी ही माहिती दिली आहे.

निष्पक्ष चौकशीसाठी तयार आहे पाकिस्तान 

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी यापूर्वी म्हटले होते की, या आठवड्यात काश्मीरमधील पहलगाममध्ये 26 जणांच्या हत्येप्रकरणी कोणत्याही ‘निष्पक्ष आणि पारदर्शक’ चौकशीसाठी पाकिस्तान तयार आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानने सर्व प्रकारच्या दहशतवादाची टीका केली आहे आणि देश स्वतः त्याचा बळी ठरला आहे. डॉन डॉट कॉमच्या वृत्तानुसार, काकुल येथील पाकिस्तान मिलिटरी अकादमीमध्ये पासिंग-आउट परेडला संबोधित करताना शाहबाज शरीफ म्हणाले की, भारत कोणत्याही विश्वासार्ह तपासाशिवाय, पडताळणीयोग्य पुराव्याशिवाय पाकिस्तानवर निराधार आणि खोटे आरोप करत आहे. पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले की, एक जबाबदार देश म्हणून आपली भूमिका कायम ठेवत, पाकिस्तान कोणत्याही निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे. असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button