महाराष्ट्र

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पाकिस्तानला ‘ती’ गोष्ट खटकली?; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं टायमिंग ठरतंय चर्चेचा विषय, 5 महत्त्वाची कारणं

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. 

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) केला. या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत. पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला.

स्थानिकांनी रेकी करून मदत केल्याची माहिती-

पहलगाम हल्ला 8 ते 10 दहशतवाद्यांकडून झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दहशतवाद्यांना 2 ते 3 स्थानिकांची मदत झाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली. दहशतवाद्यांपैकी 5 ते 7 जण पाकिस्तानचे असल्याची माहिती समोर आली आहे. कोणाला शंका येऊ नये म्हणून स्थानिक भाषेत संवाद साधला जात होता. पोलिसांच्या वेशातल्या स्थानिकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याची माहिती समोर आली. तसेच पोलिसांच्या वेशातल्या स्थानिकांनी रेकी करून मदत केल्याची माहिती देखील मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता कोणतं पाऊल उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय असू शकतात हल्ल्यामागचे हेतू? 

1. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्सचा भारत दौरा 

– आम्ही कधीही काहीही करु शकतो हा हल्ल्याद्वारे अमेरिकेला इशारा
– व्हान्स यांच्यासाठी अमेरिकेचे सी-१७ ग्लोबमास्टर विमाने
– अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांवर एक प्रकारे मात करण्याचा प्रयत्न

2. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सौदी अरेबिया दौरा 

– काश्मीरचा वाद मिटला नाही हा भारत-सौदी अरेबियाला संदेश
– मित्र देश सौदी अरेबिया भारताच्या जवळ जातोय हे पाकिस्तानला खटकले
– सौदी अरेबिया पाकला भीक देईना, भारतासोबत मात्र अब्जावधींचे करार

3. काश्मीरमध्ये पर्यटकांचा वाढता ओघ 

– ‘काश्मीरमध्ये सर्व सुरळीत होतंय’ हे वास्तव मोडण्याचा प्रयत्न
– यंदा साडे तीन महिन्यांत 2.35 कोटी पर्यटकांची भेट
– 2023ला 2.11 कोटी तर 2022 मध्ये 1.88 कोटी पर्यटकांची भेट
– पर्यटकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न

4. आगामी अमरनाथ यात्रेला इशारा 

– अमरनाथ यात्रा पहलगाममधूनच सुरू होते
– यंदा 3 जुलैपासून यात्रा, यात्रेची सध्या तयारी
– यात्रेकरुंच्या मनात भीती निर्माण करण्याचा हेतू

5. पाकच्या लष्करप्रमुखांच्या बोलण्यातून संकेत 

-लष्करप्रमुख असीम मुनीर म्हणाले,काश्मीर म्हणजे गाझा
– मुनीर म्हणाले, हिंदूंच्या तुलनेत मुस्लिमांचे,रीति रिवाज,संस्कृती,विचार वेगळे
– मुनीर म्हणाले, पाकसाठी पूर्वजांनी बलिदान दिले,त्याचे रक्षण करणे आम्हास ठाऊक
– मुनीर म्हणाले, काश्मीर आमच्या गळ्याची नस होती,आहे आणि असेल.

महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू-

जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात  डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय.   डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय.  तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झालेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button