महाराष्ट्र

Indurani Jakhar : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश

Indurani Jakhar IAS Transfer : इंदुराणी जाखर यांची कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तपदावरून पालघरच्या जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. 

मुंबई : राज्याच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी इंदुराणी जाखर यांची बदली पालघरच्या जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे. तसे आदेश मंत्रालयातून काढण्यात आले आहेत. इंदुराणी जाखर (Indurani Jakhar IAS) यांच्याकडे कल्याण डोंबिवली आयुक्तपदाचा कार्यभार होता. आता पालघरच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार (Palghar District Collector) त्वरीत घ्यावा असे आदेशात म्हटलं आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच आहे. त्यामध्ये आता इंदुराणी जाखर यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत. पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या निवृत्तीनंतर त्यांची वर्णी लागली आहे.

Who Is Indurani Jakhar IAS : कोण आहेत इंदुराणी जाखर? 

इंदुराणी जाखर या 2016 बॅचच्या आयएएस अधिकारी असून यूपीएससीच्या दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी देशात 30 वा क्रमांक पटकावला. जाखर या मूळच्या हरियाणातील झज्जरमधील आहेत. पण नंतर त्यांचा परिवार हा दिल्लीमध्ये स्थायिक झाला. त्यांचे वडील हे दिल्ली पोलिसमध्ये होते.

इंदुराणी जाखर यांनी 2013 साली एमबीबीएसची पदवी घेतली. त्यानंतर यूपीएससीची तयारी सुरू केली. दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी 30 वा क्रमांक पटकावून आयएएस पद मिळवलं.  इंदुराणी यांचे पतील मोहित कुमार गर्ग असून ते आयपीएस अधिकारी आहेत.

गेल्याच आठवड्यात राज्यातील पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

Maharashtra IAS Transfer List : कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या?

1. बी.एच. पालवे (आयएएस: एससीएस: 2013) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर यांना महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

2. मनोज रानडे (आयएएस: एससीएस: 2024) संचालक, नगर प्रशासन, मुंबई यांना जिल्हा परिषद, पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

3. शुभम गुप्ता (आयएएस: आरआर: 2019) महानगरपालिका आयुक्त, सांगली यांना विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

4. अंजली रमेश. (आयएएस: आरआर: 2020) संवर्ग मध्य प्रदेशातून महाराष्ट्र संवर्गात बदली जिल्हा परिषद, हिंगोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

5. झेनिथ चंद्र देवंथुला (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, वरोरा उपविभाग, चंद्रपूर यांना प्रकल्प अधिकारी, ITDP, किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button