Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणात मोठा खुलासा; दिशाच्या लॅपटॉपमध्ये मिळाला वडिलांचा व्हाट्सएप डेटा, महिलेला पैसे पाठवल्याची माहिती

Disha Salian Case: वडिलांचं घर सोडून मालाड मालवणीस गेल्याचं दिशानं मित्रांना सांगितलं होतं. दिशाच्या मित्रांनी पोलीस चौकशीतही दुजोरा दिला आहे.
Disha Salian Case: दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दिशाच्या लॅपटॉपमध्ये वडील सतीश सालियानं यांचा व्हाट्सएप डेटा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. आधीच्या एसआयटीला चौकशीदरम्यान हा डेटा मिळाला होता. दिशाचे वडील सतीश सालियान यांचे एखाद्या महिलेशी संबंध असल्याचा दिशाला संशय होता. आपलं व्हाट्सएप दिशाही बघतेय याची वडिलांना माहिती नव्हती. त्या महिलेला 3 हजार रुपये दिल्याचा दिशानं जाब विचारला होता. 2 जून 2020 ला जाब विचारला होता, 4 जूनला दिशाने घर सोडले होते. वडिलांचं घर सोडून मालाड मालवणीस गेल्याचं दिशानं मित्रांना सांगितलं होतं. दिशाच्या मित्रांनी पोलीस चौकशीतही दुजोरा दिला आहे.
नेमकं काय प्रकरण?
दिशा सालियनने आत्महत्या केली की तिची हत्या केली, याच्या तपासादरम्यान पहिल्या एसआयटी चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झालेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशाला तिचे वडील सतीश सालियन एका महिलेशी बोलत असल्याचा संशय होता, त्यानंतर दिशाने तिच्या लॅपटॉपमधील तिच्या वडिलांच्या व्हॉट्सॲपचा ॲक्सेस त्याच्या नकळत घेतला होता, जेणेकरून तिचे वडील कोणाशी बोलतात आणि काय करतात हे तिला कळू शकेल.
यावेळी दिशाच्या लक्षात आले की, तिच्या वडिलांनी एका महिलेला 3000 रुपये पाठवले आणि तेही तिला न सांगता. वडिलांनी हे पैसे पाठवल्याने तिला खूप वाईट वाटले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2 जून 2020 रोजी दिशाने त्या चॅटच्या आधारे तिच्या वडिलांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आणि दोघांमध्ये वाद झाला. यानंतर 4 जून 2020 रोजी दिशा घर सोडून मालाड मालवणी येथे गेली. याबाबत दिशाने तिच्या मैत्रिणींशी चर्चाही केली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, दिशाचा मृत्यू झाला तेव्हा पोलिसांनी तिच्या मित्रांची चौकशी केली, त्यादरम्यान मित्रांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती. दिशाने हे का केलं असावं, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी दिशाचे वडिल सतीश सालियन यांचाही जबाब नोंदवला, ज्यात त्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांचा आणि त्यांच्या मित्राचा लोणचे बनवण्याचा व्यवसाय होता, त्याच दरम्यान त्याच्या मित्राचा मृत्यू झाला. लोणची बनवण्याचा व्यवसायही फायदेशीर नव्हता आणि सतीशच्या मित्राच्या पत्नी आर्थिक अडचणीत होती.
मित्राची बायको असल्याने सतीश सालियान यांना तिची खूप काळजी वाटत होती आणि त्यांनी दिशाला पैशाची मदत करायला सांगितली, त्यावर दिशाने उत्तर दिले की, तिच्याकडेही पैशांची अडचण आहे, ती त्या महिलेला कशी मदत करेल. सतीश सालियान यांचा दावा केला होता की, त्याचे आणि त्याच्या मित्राच्या पत्नीमध्ये काही नव्हतं, फक्त मानवतेच्या नात्याने ते तिला मदत करत होते.
आधीच्या एसआयटीच्या तपासामध्ये असं समोर आलं होतं की, दिशाच्या मित्रांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं त्यावेळी त्यामध्ये उल्लेख होता की, दिशाने मित्रांना सांगितलं होतं की, दिशाच्या वडिलांनी एका महिलेला पैसे पाठवले होते. मात्र, सतीश सालियान यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला तेव्हा त्यावेळी पोलिसांना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ती महिला त्यांच्या मित्राची पत्नी आहे आणि तिला पैशाची गरज होती, म्हणून पैसे दिले होते. यामागे चुकीचा विचार नव्हता, यामागे कोणत्याही चुकीच्या प्रकारचा हेतू नव्हता. पण दिशाच्या लॅपटॉपमध्ये वडील सतीश सालियानं यांचा व्हाट्सएप डेटा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. पुरावे आणि डेटा हा चौकशीचा भाग आहे. मात्र, यामुळे दिशा देखील डिस्टर्ब असल्याचा दावा पूर्वीच्या एसआयटीने केला होता. मात्र, आत्ता एसआयटीद्वारे पुन्हा एकदा तपास व्हावा, त्याचबरोबर दिशाच्या वडिलांनी अनेक गंभीर आरोप केलेले आहेत.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून आमदार आदित्य ठाकरे आणि दिनो मौर्या यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. सतीश सालियान यांनी याचिकेतून या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा. सालियान कुटुंबावर दबाव टाकून दिशाभूल केल्या प्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल करावा. पारदर्शक तपास होण्यासाठी राज्याबाहेर तपास होऊ द्यावा. दिशाचं शवविच्छेदन करतानाचं चित्रीकरण आणि कागदपत्र समोर आणावे. आदित्य ठाकरेंसह त्यांचा बॉडीगार्ड, सुरज पांचोली, दिनू मौर्या आणि मुंबई पोलिसांचे मोबाईल टॉवर लोकेशन काढण्यात यावे. दिशाचा फोन आणि लॅपटॉप दिशाचा प्रियकर रोहन रॉयकडे देण्यात आले आहेत. ते दिशाच्या कुटुंबाकडे देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आलेल्या आहे.