महाराष्ट्र
अक्षय कुमार’ने लावला सागर कारंडेला 61 लाखांचा चुना, तपासात समोर आली धक्कादायक बाब

sagar karande cyber fraud : अभिनेता सागर कारंडेची 61 लाखांची सायबर फसवणूक झाली. सागरला चुना लावणारा अक्षय कुमार होता. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई : चला हवा येऊ या द्या कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेला अभिनेता सागर कारंडे याची सायबर फसवणूक झाल्याची माहिती काही दिवसांआधी समोर आली होती. सागर कारंडेला तब्बल 61 लाखांचा चुना लावण्यात आला होता. या प्रकरणी सागरने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सागरला 61 लाखांचा चुना लावणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.
अक्षय कुमार याने सागर कारंडेला 61 लाखांचा चुना लावला. पोलिसांनी अक्षय कुमारला ताब्यात घेतलं आहे.सागर कारंडेला ऑनलाइन टास्कद्वारे कमाईचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.




