रायगडमध्ये पुन्हा ठाकरेंना मोठा धक्का, स्नेहल जगताप यांच्यानंतर ‘हा’ नेता अजितदादांच्या गळाला

गेल्या काही दिवसांपासून कोकणात ठाकरे गटाला (Shivsena Thackeray Group) धक्क्यांवर धक्के बसत आहेत. पक्षाचे अनेक नेते कार्यकर्ते ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत.
Raigad : गेल्या काही दिवसांपासून कोकणात ठाकरे गटाला (Shivsena Thackeray Group) धक्क्यांवर धक्के बसत आहेत. पक्षाचे अनेक नेते कार्यकर्ते पदाधिकारी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यांच्यानंतर आणखी एक नेता अजित पवार यांच्या गळाला गालला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे (Sameer Shedge) यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. लवकरच ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.
येत्या 13 तारखेला शेडगे सुनील तटकरे यांच्या उपस्थिती प्रवेश करणार
शिवसेना ठाकरे गटाचे रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वाचा तसेच तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. येत्या 13 तारखेला शेडगे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थिती प्रवेश करणार आहेत. त्यामुळं स्नेहल जगताप यांच्यानंतर रायगडमधून ठाकरेंचा आणखी एक मोठा नेता पक्ष सोडून जात असल्यामुळे रायगड मध्ये ठाकरेंची ताकद दुबळी होणार आहे.
महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप (Manikrao Jagtap) यांच्या कन्या स्नेहल जगताप (Snehal Jagtap) यांनी काही दिवसापूर्वीच शिवसेना ठाकरे(Shivsena UBT) पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून स्नेहल जगताप उद्धव ठाकरे यांची साथ सोडून महायुतीतील भाजप अथवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात रंगली होती. अशातच भाजपच्या वाटेवर असणाऱ्या स्नेहल जगताप यांनी अखेर राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला आहे. आता स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र कोकणात परत एकदा ठाकरे गटाला धक्का बसला आहे. दरम्यान, आता पुन्हा कोकणात ठाकरे गटाला धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे रोहा तालुकाप्रमुख समीर शेडके यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. ते लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
महगत्वाच्या बातम्या:
कोकणात उध्दव ठाकरेंना पुन्हा धक्का; भाजपच्या वाटेवर असणाऱ्या स्नेहल जगताप अखेर अजित दादांच्या राष्ट्रवादीत!
महत्वाच्या बातम्या: