Uncategorized
मोदींच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार? महाराष्ट्रातून कुणाची लागणार केंद्रात वर्णी?
महाराष्ट्रातून शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रीय मंत्रिपदासाठी उत्सुक आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणत्या पक्षातील नेत्याची वर्णी लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं, असं वृत्त न्यूज १८ ने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. त्याचबरोबर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवडही एप्रिलच्या अखेरीस होऊ शकते, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातून शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रीय मंत्रिपदासाठी उत्सुक आहे, त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात यापैकी कोणत्या पक्षातील नेत्याची वर्णी लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.