महाराष्ट्र
मंगळवार दिनांक 22 रोजी जम्मू काश्मीर खोऱ्यात पहेलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात सुमारे 28 निष्पाप नागरिक मृत झाले असून अनेकजण गंभीर झाले आहेत. या भ्याड हल्ल्याचा भाजप मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने बुधवारी सकाळी माजी पालकमंत्री आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर जाहीर निषेध करण्यात आला व हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी करण्यात आली

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, नूतन मंडल अध्यक्ष अनिता हारगे, चैतन्य भोकरे, मयूर नाईकवाडे, अभिजीत गौराजे, बाबासाहेब आळतेकर, राजेंद्र माने, महेश धयारे, रविकांत साळुंखे, विजय केरीपाळे, राजेंद्र नातू, महेश फोंडे, मनीष देशपांडे, मिलिंद भिडे, श्रीकांत महाजन, बंडोपंत कुलकर्णी, अनघा कुलकर्णी, रूपाली गाडवे, कपिल पाटील, गायत्री सातपुते, साधना माळी, सौ. ज्योती मगदूम, सीमा मगदूम यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.