Uncategorized
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख हे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यानच आज संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे अजितदादांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाल्यानंतर आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आज धनंजय देशमुख यांनी अजितदादांची भेट घेतली आहे. त्यांच्यात काय चर्चा होते ते पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.