महाराष्ट्र

Nagpur Violence : संतापजनक! नागपुरातील तणावादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न; वर्दी खेचली, अश्लील शेरेबाजीही

Nagpur Violence : उपराजधानीत सोमवारी झालेल्या या राड्यात रात्री नागपूरच्या चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंसा सुरू असताना एक लाजिरवाणी घटनाही घडली.

Nagpur Violenceराज्याच्या उपराजधानीत कधी नव्हे ते ऐवढया मोठ्या प्रमाणात हिंसाचार (Nagpur Violence) उफाळल्याची घटना घडली. सध्या या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहेत. सध्या नागपूरमध्ये तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त करत परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. मात्र सोमवारी झालेल्या या राड्यात रात्री नागपूरच्या चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंसा सुरू असताना एक लाजिरवाणी घटनाही घडली. यात महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना अंधाराचा फायदा घेत जमावाने त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केलाय.

यावेळी काही माथेफिरूंनी पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी खेचण्याचे प्रयत्न केलाय. नागपूरच्या गणेश पेठ पोलीस स्थानकामध्ये असे लाजिरवाणी कृत्य करणाऱ्या जमावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच ठिकाणी असलेल्या इतर महिला पोलिसांनाही जमावातून शिवीगाळ करण्यात आली, तसंच अश्लील शेरेबाजीही करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांवर कुऱ्हाडीने वार, पोलिसांवर दगडफेक, ते चक्क महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यापर्यंत या दंगेखोरांची मजल गेल्याच्या घटनेने अनेक सवाल आता विचारले जाऊ लागले आहे.

जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पीसीआर 

नागपुरातील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पीसीआर घेतला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा या आरोपींना कोर्टाने 21 पर्यंत पीसीआर दिला आहे. तर रात्री अडीच वाजेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली आहे. आतापर्यंत एकूण 46 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी 36 आरोपींना काल पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं. यातील सहा आरोपी हे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. यातील सर्व आरोपींविरोधात गणेशपेठ आणि तहसील पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संचारबंदी असलेल्या भागातील शाळा आजही बंद!

नागपूर शहरातील संचारबंदी असलेल्या भागातील शाळा आजही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. नागपूर पोलिसांच्या तीन जून अंतर्गत अकरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आजही संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील 200 शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतलेला आहे. मात्र सकाळी विद्यार्थ्यांना मेसेज उशिरा पोहोचल्याने अनेक विद्यार्थी शाळेमध्ये येऊन आल्या पावली परत जात आहेत. तर  नागपूरच्या महाल भागातील हिंसाचार ग्रस्त भागात सोमवारच्या रात्री ज्या वस्त्यांवर हल्ला करण्यात आला ते हल्लेखोर परत त्या भागात येऊ नये यासाठी तेथील नागरिकांनी रात्रीच्या सुरक्षेसाठी पब्लिक बॅरिकेटिंग केल्याचे पाहायला मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button