महाराष्ट्र

Ashish Shelar : ठाकरेंच्या हाती सभेत दाखवण्यासाठी रुद्राक्षांची माळ, तोंडी औरंगजेबाचाच जप; आशिष शेलारांचा प्रहार; ‘छावा’वर महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी…

Ashish Shelar on Uddhav Thackeray : अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर उभे राहिले, महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर कोट्यवधी श्रध्दाळू दर्शन करुन आले, असेही आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

Ashish Shelar on Uddhav Thackeray : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने बऱ्यापैकी यश मिळवले होते. ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आले होते. पण विधानसभा निवडणुकीपर्यंत चित्र पालटलं. विधानसभेला उद्धव ठाकरे गटाचे फक्त 20 आमदार निवडून आले.  तर काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांचे रक्षण करणे हेच भाजपचे हिंदुत्व आहे काय?, असा संतप्त सवाल करत भाजपवर निशाणा साधला होता. आता राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.

नेमकं काय म्हणाले आशिष शेलार?

आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर उभे राहिले, महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर कोट्यवधी श्रध्दाळू दर्शन करुन आले. आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील “छावा” सिनेमा आला. महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी लोकांनी तो पाहिला. “छावा” वर महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी आणि त्यांचा “सामना” सोडून जगभरातील लिहिणारे, बोलणारे बोलत आहेत. स्वागत करीत आहेत. कुंभमेळा भरला, महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी भाविक सहभागी होऊन पवित्र स्नान करुन आले. सभेत दाखवण्या पुरती हातात रुद्राक्षाची माळ घातली. औरंगजेबाचा जप ज्यांच्या सदैव तोंडी, ओळखलेत का? महाराष्ट्रातील ते हिंदुत्ववादी ढोंगी? असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button