कर्जापोटी स्वतः ऐवजी दुसऱ्यांची मालमत्ता तारण देऊन व कर्जाच हप्ते न भरता बँकेची ४९ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी चौघावर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गजानन यशवंत शिंदे संदीप यशवंत शिंदे सौ स्वप्नाली
गजानन शिंदे यशवंत दाजी शिंदे सर्व राहणार गजानन नगर ग.न.४ त्यांची नावे आहेत याप्रकरणी एनकेजीएसबी बँकेच्या मॅनेजर तृप्ती अनुप जोशी वय ३९ रा. कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे येथील गजानन शिंदे संदीप शिंदे सौ स्वप्नाली शिंदे व यशवंत शिंदे या चौघानी सन २०२० मध्ये एनकेजीएसबी बँकेचा कोल्हापूर शाखेतून ४९ लाखाचे कर्ज घेतले होते त्या पोटी हि
शिंदे यांनी कोरोची गट नंबर ७ ची जागा कारण म्हणून दिली होती परंतु कर्ज घेतल्यापासून शिंदे यांनी आज तागायत कर्जाचे हप्ते भरले नाहीत शिवाय कारण दिलेली जागा ही शिंदे यांची नसून ती दुसऱ्या व्यक्तीचे असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे बँकेची
४९ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी शहापूर पोलिसात फिर्याद दाखल झाली आहे