Uncategorized
Maha Kumbh Stampede : संगमावर स्नान करण्याचा आग्रह सोडा, महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर योगी आदित्यनाथांचं आवाहन,अखिलेश यादव म्हणाले…
MAHAKUMBH

Maha Kumbh 2025 : प्रयागराज येथील कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ अन् अखिलेश यादव यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Maha Kumbh Stampede प्रयागराज: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. यामध्ये मध्यरात्री (29 जानेवारी) एक वाजताच्य सुमारास चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची तर 50 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना फोन केल्याची माहिती आहे. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर योगी आदित्यनाथ आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. योगी आदित्यनाथांनी भाविकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे. गंगा नदीच्या ज्या घाटाजवळ असाल तिथं स्नान करा, संगम घाटाकडे जाण्याचा प्रयत्न करु नका, असं देखील आवाहन योगी आदित्यनाथांनी केलं.